मुंबई | भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी लता मंगेशकर यांच्या प्राणज्योत मालावली. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण आणि न्यूमोनियाने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालय दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांनी आज (६ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजून १२ मिनिटाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. लता दीदींच्या जाण्याने देशात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र ट्वीटमध्ये म्हणाले, “मी शब्दांच्या पलीकडे व्यथित झालो आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या आहेत. दीदींच्या जाण्याने देशात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पुढील येणाऱ्या पिढ्या भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून त्यांना स्मरणात ठेवतील. लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती,” असे ते म्हणाले.
लता दीदींच्या गाण्यांनी विविध प्रकारच्या भावना प्रकट केल्या असून अनेक दशकांपासून भारतीय चित्रपटातून त्यांनी गाणी गायले असून या चित्रपटांच्या पलीकडे त्यांनी नेहमीच देशाच्या प्रगतीबद्दल उत्कट होती. त्यांना नेहमीच एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. लता दीदींकडून मला नेहमीच स्नेह मिळाला आहे. हा मी माझा सन्मान समजतो. माझा तिच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहील. लता दीदींच्या निधनाबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांसोबत शोक व्यक्त करतो. तिच्या कुटुंबीयांशी बोलून शोक व्यक्त केला. ओम शांती.
I consider it my honour that I have always received immense affection from Lata Didi. My interactions with her will remain unforgettable. I grieve with my fellow Indians on the passing away of Lata Didi. Spoke to her family and expressed condolences. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.