HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

भारताला जसे मित्रत्व निभावता येते, तसे डोळ्यात डोळे घालून योग्य उत्तरही देता येते !

मुंबई | भारताला जसे मित्रत्व निभावता येते, तसे डोळ्यात डोळे घालून योग्य उत्तरही देता येते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माधमातून दिला आहे. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.

देशातील कोरोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा देशाला संबोधित केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. आज (२८ जून) पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पुन्हा जनतेशी संवाद साधला. ‘मन की बात’चा आजचा ६६ वा भाग होता.

सध्याचा कोरोनाच्या संकटांवर मात  २०२० वर्ष आव्हानात्मक आहे. आपण अम्फान, निसर्गसारख्या चक्रीवादळांचा सामना केला आहे. कोरोना संकटाला तोंड देत आहोत. याशिवाय लडाखमध्ये कुरघोड्या करणाऱ्या शेजाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे, असे मोदी म्हणाले. संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. या काळात भारत जगाची मदत करत आहे. भारताने कायम बंधुत्वाची भावना जोपासली आहे, असे मोदी म्हणाले.

 

Related posts

छत्तीसगढमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

News Desk

Corona World Update : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाखांच्या वर

News Desk

औरंगाबादेतील दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागले | धनंजय मुंडे

News Desk