HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तराखंडला १७,५०० कोटींची भेट!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३० डिसेंबर) उत्तराखंडमध्ये १७ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या २३ प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. १९७६ मध्ये पहिल्यांदा ज्या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली आणि त्यानंतर तो प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, अशा लाखवार बहुउद्देशीय प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली. त्यांनी ८७०० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे देखील उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. या रस्ते प्रकल्पांमुळे दुर्गम, ग्रामीण आणि सीमावर्ती भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. कैलास मानसरोवर यात्रेसाठी देखील सुधारित दळणवळण सुविधा उपलब्ध होतील.

उधम सिंग नगर येथे एम्स ऋषिकेश सॅटेलाईट सेंटर आणि पिथौरागढ येथील जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणीही त्यांनी केली. ही सॅटेलाईट सेंटर्स देशाच्या सर्व भागात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांना अनुसरून असतील. त्यांनी काशीपूर येथे अरोमा पार्क आणि सितारगंज येथे प्लॅस्टिक इंडस्ट्रियल पार्क आणि राज्यभरात गृहनिर्माण, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. यावेळी एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी कुमाऊंसोबत त्यांचे प्रदीर्घ काळापासून संबंध असल्याची आठवण करून दिली आणि त्यांना उत्तराखंडी टोपी देऊन सन्मानित केल्याबद्दल प्रदेशातील लोकांचे आभार मानले.

हे दशक उत्तराखंडचे दशक

हे दशक उत्तराखंडचे दशक आहे, असे त्यांना का वाटते हे यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले. उत्तराखंडमधील लोकांचे सामर्थ्य या दशकाला उत्तराखंडचे दशक बनवेल, असे पंतप्रधान म्हणाले. उत्तराखंडमध्ये वाढणारी आधुनिक पायाभूत सुविधा, चार धाम प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग बांधले जात आहेत, यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक ठरेल. जलविद्युत, उद्योग, पर्यटन, नैसर्गिक शेती आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रात उत्तराखंडने केलेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला ज्यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक होईल असे ते म्हणाले.

डोंगराळ भागांच्या विकासासाठी अथकपणे काम करणारा विचारप्रवाह आणि डोंगराळ प्रदेशांना विकासापासून दूर ठेवणारा विचारप्रवाह यातील फरक पंतप्रधानांनी स्पष्ट केला. ते म्हणाले, विकास आणि सुविधांच्या अभावी अनेकांनी या प्रदेशातून इतर ठिकाणी स्थलांतर केले. ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेने सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, उधम सिंग नगर येथे एम्स ऋषिकेश उपग्रह केंद्र आणि पिथौरागढ येथील जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणीमुळे राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत होतील.

हा विलंब गुन्ह्यापेक्षा कमी नाही

मोदी म्हणाले, “सरकारी योजनांमध्ये विलंब हा पूर्वी सरकारमध्ये असलेल्यांचा कायमचा पायंडा होता. आज उत्तराखंडमध्ये सुरू झालेल्या लखवार प्रकल्पाचाही तोच इतिहास आहे. या प्रकल्पाचा विचार पहिल्यांदा १९७६ मध्ये झाला होता. आज ४६ वर्षांनंतर आपल्या सरकारने त्याच्या कामाची पायाभरणी केली आहे. हा विलंब गुन्ह्यापेक्षा कमी नाही”, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आठवलेंचे स्वप्न भंगले; भाजपने निवडले दोन साथीदार!

News Desk

UP च्या विजयासाठी ओवैसी आणि मायावतींना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा; राऊतांचा भाजपला टोला

Aprna

महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे !

News Desk