HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! तीनही कृषी कायदे मागे

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशवासियांना संबोधित करतांना संसदेने पारित केलेली तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. मोदी आज काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागून होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संभाषणात मोठी घोषणा करत वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केलीये. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत . त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो

तिन्ही कृषी कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला असून याच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर , मोदींची घोषणा महत्वाची मानली जात असून याचा राजकीय क्षेत्रावर व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडल्याची कबुलीही दिली. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या हितासाठी संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेने चांगली नियत ठेवून आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. एक वर्ग विरोध करत होता. ते आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. अनेकांनी त्यांना या कायद्याचं महत्त्वं सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आणि तर्कही जाणून घेतली. त्यात कसूर ठेवली नाही, असं असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले.

अधिकाधिक शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी नियम बदलले

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी अस देखील म्हणाले आम्ही शेतकरी उत्पादन वाढवलं. आम्ही पीक विमा योजना अधिक प्रभावी बनवली,. त्यात सर्वांना आणलं. संकटाच्या काळात अधिकाधिक शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी नियम बदलले. त्यामुळे गेल्या चार वर्षात एक लाख कोटी लोकांपेक्षा अधिक नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना दिली. आम्ही छोटे शेतकरी आणि मजुरांपर्यंत विमा आणि पेन्शन सुविधा दिली. आम्ही शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी 1 लाख 62 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यांच्या खात्यात. शेतकऱ्यांना उत्पादनावर चांगली किंमत मिळावी म्हणून अनेक पावले उचलली. आम्ही एमएसपी वाढवली. आणि खरेदी केंद्रही वाढवले. आम्ही देशभरातील कृषी बाजारांचं आधुनिकीकरण केलं. त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले. आम्ही कृषी बजेट पाच पटीने वाढवलं. असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी हक्कासाठी लढा देणार्‍या वयोवृद्ध आनंदराव पाटील यांना जयंत पाटलांनी दिले आश्वासन 

News Desk

जयंत पाटलांचा सासरवाडीत पराभव, भाजपचा एकतर्फी विजय

News Desk

अनिल देशमुख अटकेच्या भीतीने गायब?, ‘ईडी’कडून शोधाशोध सुरु

News Desk