HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान आज मुखयमंत्र्यांशी ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधणार संवाद

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (११ मे) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत लॉकडाऊन कसा शिथील करायचा या बाबत दीर्घ चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे. कोरोनाला नियंत्रणात कसे आणायचे आणि अर्थव्यवस्था कशी स्थिर करायची यावरही चर्चा होणार आहे. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून लॉकडाऊन वाढवायचा की नाही? हे ठरणार आहे. तसेच, प्रत्येक राज्या-राज्यांमध्ये लॉकडाऊन वाढवायचा की नाही हे संबंधित राज्याचे मुख्यमंत्री ठरवतील, अशी भूमिका पंतप्रधान मोदी घेऊ शकतात, अशीही माहिती मिळत आहे.

आजच्या बैठकीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात कोरोनाने घातलेला हैदोस यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. यो दोन राज्यांमध्ये कोरोनाला नियंत्रित आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत आणि त्रुटी राहिल्या आहेत, यावरही चर्चा होऊ शकते. कोरोनाच्या या संकटकाळात आजची बैठक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज देशात अनलॉक, तर ‘या’ राज्यात आणखी २ आठवडे वाढला लॉकडाऊन

News Desk

राज्यात आज ११,१११ नवे रुग्ण आढळले तर ८८३७ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

आनंदाची बातमी! संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत दिली जाणार – डॉ.हर्षवर्धन

News Desk