HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सलग २ दिवस होणार चर्चा 

नवी दिल्ली | देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. शुक्रवारी (१२ जून) देशातील कोरोनाबाधितांचा आकडा चक्क ३ लाखांच्या पार गेला आहे. तर राज्यातील आकड्यानेही १ लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गंभीर बाब म्हणजे देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल १ तृतीयांश कोरोनाबाधित हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. याच पार्श्वभूमीवर, देशातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान मोदी आता पुन्हा एकदा देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. येत्या १६ आणि १७ जून असे सलग २ दिवस पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची ही बैठक चालणार आहे. या दोन्ही दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते.

देशातील ज्या ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा कमी त्याचप्रमाणे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट जास्त आहे अशा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान येत्या १६ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. यामध्ये पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड आणि झारखंड अशा काही राज्यांचा समावेश होती. तर १७ जून रोजी ज्या ज्या राज्यामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे, रुग्णसंख्या अधिक आहे अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी चर्चा करतील. या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह तमिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह अशा अन्य काही राज्यांचा समावेश असणार आहे. अशा पद्धतीने सलग २ दिवस पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची ही बैठक होणार आहे.

येत्या १६ आणि १७ जूनला पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी ही सहावी बैठक असणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि सर्व राज्य-केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या ५ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एस.सी – एस.टी कायद्या विरोधात आझाद मैदान येथे धरणे आंदोलन

News Desk

अल कायदाच्या म्होरक्याची कश्मीरवर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी !

News Desk