HW News Marathi
महाराष्ट्र

उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना शुभेच्छा – प्रितम मुंडे

जालना | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज (१ डिसेंबर) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावरून भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी टीका केली आहे. “उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशानं शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा”, असं म्हणत खासदार प्रितम मुंडे यांनी शिवसेनेला टोमणा लगावला आहे.

“उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला त्यांनी काँग्रेसकडून नशीब आजमावून पाहिलं. आता शिवसेनेत गेल्यानं त्यांचं स्वत:चं नशीब किंवा शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं प्रितम मुंडे म्हणाल्या आहेत.

राज्य सरकारची ही वर्षपूर्ती जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती असल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त प्रितम मुंडे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. “कुठल्याच बाबतीत हे सरकार चांगलं काम करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे” अशी टीका प्रितम मुंडे यांनी केली. त्याचबरोबर लवकरच आपल्या कर्मानं हे जिथून आले तिथे परत जातील आणि भारतीय जनता पार्टी ही आपल्याला सत्तास्थानी दिसेल, असं प्रितम मुंडे यांनी म्हटल आहे.

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं.

पण लोकसभा निवडणुकीत उर्मिलाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला आज शिवबंधन हाती बांधणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तास्थापनेची कागदपत्रे उद्या सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

News Desk

राज्यात ‘पाणलोट विकास घटक २.०’ योजना राबविण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे शंकरराव गडाख यांचे निर्देश

Aprna

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा! – मुख्यमंत्री

Aprna