HW News Marathi
महाराष्ट्र

‘करोनाच जागतिक संकट दूर कर!’, प्रीतम मुंडेंची गणरायाचरणी मागणी

मुंबई | देशात आज(१० सप्टेंबर) गणेशोत्सव साजरा होत आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालं आहे. गणपतीचरणी त्यांनी कोरोनाचं संकट आणि अतिवृष्टीचं सावट दूर व्हावं यासाठी प्रार्थना केली आहे.

काय आहे ट्विट?

प्रीतम मुंडे यांनी ट्विट करत गणरायाचे दर्शन चाहत्यांना दिले आहेत. “दरवर्षीप्रमाणे यंदाही आईबाबांच्या घरच्या गणपती पूजनात सहभागी होऊन बाप्पाचे आशिर्वाद घेतले. करोनाच जागतिक संकट आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीच सावट दूर करण्याची विघ्नहर्त्याला प्रार्थना केली”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

पंतप्रधानांकडून मराठीमधून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नाणेंद्र मोदींकडून भारतवासीयांना आज(१० सप्टेंबर) मराठी मधून गणेशोत्सवाच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या काळात कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. मात्र, असं असलं तरीही गणेशभक्तांच्या मनातला उत्साह मोठा आहे. पुढचे १० दिवस हा उत्साह असाच कायम राहणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलदायी झालं आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य सरकारचा नेमका निर्णय काय?

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि…”, ऊर्जामंत्र्यांचं आवाहन

News Desk

भाजप कार्यकारणीची उद्या मुंबईत बैठक होणार

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील सुनावणी १७ मार्चला होणार

swarit