HW Marathi
महाराष्ट्र

तोरंगणा घाटात २५ फूट खोल दरीत खासगी बस कोसळली

पालघर | मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात २५ फूट खोल दरीत खासगी बस कोसळली आहे. यात ४ प्रवासी ठार झाले असून ४५ जखमी झाले आहेत. जखमींना त्र्यंबकेश्वरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रेक फेल होऊन बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

ही खासगी बस मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरून पालघरला येत होती. सर्व भाविक गुजरात येथील असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतल बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

 

 

 

 

Related posts

जम्मू काश्मीरमध्ये तणाव, दहशतवादी हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू, 11 जवान जखमी

News Desk

बँकांची कामे उरका; चार दिवस बँका बंद

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात नाही.

News Desk