HW News Marathi
Covid-19

महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णालयांना २८ हजारांहून जास्त शुल्क आकारता येणार नाही !

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभार्थी नसलेल्या लोकांनाही आता कोरोना उपचारांकरिता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील खाजगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्काबाबत देखील राज्याच्या आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, “आता खाजगी रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बिल आकरताना त्यांच्या बेडचे बिल प्रति दिन ४ हजारप्रमाणे आकारावे. त्यानुसार, रुग्णाचे ७ दिवसांचे बिल हे केवळ २८ हजार इतकेच असेल. या नियमाप्रमाणेच, यापुढे खाजगी रुग्णालयांनी बिल आकारावे”, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केले आहे.

महात्मा फुले योजनेअंतर्गत राज्यातील १००% जनतेला उपचार घेता येणार !

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज (२७ जुलै) औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. “महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी लागणारे पीपीई किट आणि मास्क पुरवण्याची जबाबदारी त्या संबंधित रुग्णालयाची असेल”, असे देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब यावेळी राजेश टोपेंनी नमूद केली कि, “महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बिल हे अव्वाच्या सव्वा लावल्याचे वारंवार समोर आले. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने एक निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील ८५ % नागरिकांचा या योजनेत समावेश होता. मात्र, आता उर्वरित १५ टक्के नागरिकांनाही योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच, राज्यातील १००% जनतेचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.”

महात्मा फुले योजनेची मुदतही वाढवली !

महात्मा फुले जन आरोग्य ही योजना ३१ जुलै 2020 पर्यंत लागू राहील असे सांगण्यात राज्य सरकारकडून यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, या योजनेची मुदतही आता वाढविण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा लक्षात घेता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरीता या दोन्ही योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील या योजनेंतर्गत असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी उपचार घेता येतील, असे शासनाच्या या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास आता घरीच विलगीकरण करता येणार, जाणून घ्या नियम

News Desk

‘कोरोना’मुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल !

News Desk

कोझिकोड विमान अपघाताच्या चौकशीकरिता ५ सदस्यीय समितीची स्थापना

News Desk