HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

कलाकारांचे आमरण उपोषण !

पुणे | लॉकडाऊनमुळे सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलाकार व इतर बॅक स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकारांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी अभिनेते कुमार पाटोळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. महाकलमंडळ मधील कलाकारही यामध्ये सहभागी झाले आहेत हे आंदोलन बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होत आहे.

महामंडळ या राज्याची शिखर संघटनेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,ऍड मंदार जोशी,अशोकराव जाधव-अध्यक्ष कलाकार केंद्र असोसिएशन हे पाटोळेंच्या सोबत या उपोषणाला बसून पाठिंबा दिला. अशा महाकाला मंडळाच्या मागण्या आहेत या सरकारने मान्य कराव्यात व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी हि प्रमुख मागणी आहे.

महाकलामंडळ हि संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून ते बांद्यापर्यंत ज्या विविध कलाप्रकारातील संस्था आणि कलाकारांची प्रमुख शिखर संस्था आहे.
विद्यमान अध्यक्ष -श्री. मेघराज राजेभोसले
विद्यमान कार्याध्यक्ष – श्री. लक्ष्मीकांत खाबिया
या शिखर संस्थेची मूळ प्रमुख उद्दिष्टे
१) संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कलाकार,तंत्रज्ञ,निर्मिते,संस्था यांची शासन दरबारी नोंद करणे.
२) कलाकार म्हणून शासनाचं अधिकृत ओळखपत्र कलाकारांना मिळवून देणं
३) कलाकारांचा आरोग्य विमा ( medical policy ) हि शासनानेच करून दिली पाहिजे हि मुख्य मागणी.
४) कलाकारांची वसाहत वसविण्यासाठी शासनाकडून कमीत कमी दरात एखाद्या भूखंडावर, कलाकरांना घरे बांधून देण्यासाठी आग्रही राहणार
५) ”म्हाडा” या योगनेमध्ये कलाकारांना घर घेण्यासाठी सवलत मिळावी हि मागणी.
६) शासनाने कलाकारांना जे मानधन देऊ केलंय,त्यासाठीची सध्याची वयोमर्यादा ६० वर्षे आहे. ती वयोमर्यादा कमी करून घेणे.
७) शासनाकडून प्रत्येक कलाकाराला निवृत्तीवेतन (pension) मिळावी.
८) असंघटित कलाकरांना संघटित करून सर्वाना एकाच छताखाली आणणे, ज्या योगे शासनाच्या विविध योजनांचा, सवलतींचा लाभ प्रत्येक कलाकाराला मिळेल.
कलाकारांच्या निवासाची व्यवस्था प्रत्येक जिल्हा पातळीवर एक कलाकार भवन सारखी वस्तू उभारणे तसेच शासकीय विश्राम गृहात कोणत्याही परवानगी अथवा पत्राशिवाय कलाकारांना गरज भासल्यास निवासाची सोया व्हावी.”महामंडळ या शिखरावर संघटनेमध्ये आतापर्यंत १२५ संस्था सहभागी झाल्या असून सुमारे ८. लाख कलाकार एकत्र आले आहेत.

“महामहामंडळ”मध्ये ज्या संस्था सहभागी झाल्या आहेत.त्यात चित्रपट,नाट्य ,कलापथक,मराठी वाद्यवृन्द ,हिंदी वाद्यवृन्दा ,लोककलावंत वाघ्या ,मुरली ,गोंधळी ,तुतारीवाद्क,हलगीवादक ,भारुडकलावंत ,आदिवासी कलावंत ,कळसूत्री बाहुली ,कलावंत ,बहुरूपी त्यात सोबत शाहिरी कलावंत ,तमाशा कलावंत ,कलाकेंद्रे चालविणारे कलाकार ,भजनी मंडळे ,बंद पथक तसेच तंत्रज्ञ विभाग .तसेच विदर्भ ,गडचिरोली येथील कला सादर करणारे नाट्य कलाकार , जादूगार ,बोलक्या भाहुल्यांचा खेळ करणारे कलावंत ,पंजाबी ढोल पथक यांचाही सहभाग आहे.

Related posts

EVMHacking : गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची ‘रॉ’कडून चौकशी करा !

News Desk

‘फेक न्यूज’ दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द

News Desk

राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांसबोत महत्त्वपूर्ण बैठक सुरू, पुढील रणनीती ठरणार

News Desk