मुंबई। राज्यासह देशभरात आज नागरिकत्व दुरुस्तीविरोधात आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहेत. मुंबईत कायद्याविरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात मोठे आंदोलन होणार आहे. याशिवाय राजधानी दिल्लीमधील १४ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहे. तर डावे आणि मुस्लिम संघटनांनी आज (१९ डिसेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. याचा प्रभाव उत्तर प्रदेश, बिहारपासून ते बंगळुरूपर्यंत दिसून आला आहे. डाव्यांच्या या बंदला विरोधकांनी समर्थन दिले आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे.
Entry, exit gates of Chandni Chowk, Jama Masjid, Jamia Millia among others closed
Read @ANI Story | https://t.co/fXha1n7xz4 pic.twitter.com/snSrQJQzLk
— ANI Digital (@ani_digital) December 19, 2019
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात एनएसयूआय, छात्रभारती, एसएफआय, मसाला, एआयएसएफसारख्या १८ पेक्षा जास्त विद्यार्थी संघटना, टीस, आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी एकत्र येत नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, जामिया, एएमयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करणार आहेत.
या आंदोलनात बॉलिवूडमधील कलाकार देखील सामील होणार आहेत. यात अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर असे सेलिब्रिटीसुद्धा या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुपारी चार वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होईल. याशिवाय मालेगाव, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, मनमाड, अमरावतीसह इतर ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.