बीड | शबरी आवास योजनेतून मंजुर घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. या मागणी साठी गेल्या दहा दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या गर्भवती मनीषा विकास काळे यामहिलेची आंदोलन स्थळी प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली,बाळ-बाळंतीण सुरक्षित आहे. पोलिसांनी त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारी योजनेवर आमचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे उपचार देखील नको म्हणत सरकारचे उपचारही नाकारले.
बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारातील अप्पाराव भुजा पवार गेल्या ४ वर्षापासून मंजूर घरकुलाच्या जागेसाठी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण धरणे आंदोलन करत आहेत मात्र त्यांना अद्याप पर्यंत न्याय मिळाला नाही.जागा देण्याचे आश्वासन दिले मात्र अद्याप पर्यंत आश्वासनाची पूर्ती केले नाही त्यामुळे पुन्हा एकदा २४ जानेवारी पासून पावर कुटुंबातील सर्वच सदस्य दहा ते बारा जणांचे कुटुंब दहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया देत आहे यातील २३ वर्षीय मनीषा काळे ही गर्भवती असल्याने गुरुवारी पहाटे ४ वाजता ती आंदोलन स्थळीच थंडीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रसूत झाली गोंडस बाळाला जन्म दिला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हॉस्पिटल मध्ये देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला
शबरी आवास योजनेतून २०१६ साली घरकुल मंजूर झाले खरे मात्र घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही वासनवाडी शिवारात वास्तवातल्या आप्पाराव पवार यांच्या कुटुंबाचा सहा वर्षांपासून लढा सुरू आहे पवार यांनी सहा वर्षात तीन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले आहे आत्ता २४ जानेवारीपासून ते उपोषणाला बसले आहेत घरकुलासाठी आणलेल्या ४० पोते सिमेंटचे भिजल्याने दगड झाले आहे.यामुळं आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करते कुटुंब उपोषणाला बसले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.