नवी दिल्ली | सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागांमध्ये नागरिक अडकून आहेत. या नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी विमान, रेल्वे आणि बस वाहतूक लवकरच सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचे लवकरच नियोजन केले जाईल.
मुख्यतः बससेवा आणि कॅब सेवा सुरू करण्यावर लक्ष आहे. पण यासाठी काही नियम घालण्यात येतील, असेही गडकरींनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांनी बस आणि कार ऑपरेटर संघटनेच्या सदस्यांशी आज (६ मे) चर्चा केली.
सार्वजनिक बस सेवा आणि कारची वाहतूक करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे. तसंच तोंडावर मास्क हवा, सॅनिटाइजेशन झाले पाहिजे, हात धुतले पाहिजे. सार्वजनिक बस सेवा सुरक्षित असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करावा लागेल, असं गडकरी यांनी सांगितले.
सध्या चीनसोबत व्यवहार करण्याची कुणाचीच इच्छा नाही आहे. यामुळे या कंपन्या भारतात आल्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि संपूर्ण परिस्थिती बदलेल, असे मतही गडकरींनी व्यक्त केले.
Soon government will try to resume bus transport based on some guidelines. There is a need to resume air, railways, & bus transport as people are stranded. I think it needs to be done: Nitin Gadkari, Union Minister of Road Transport & Highways #CoronaLockdown pic.twitter.com/hauUNHGQzA
— ANI (@ANI) May 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.