पुणे । पुण्यातील कोंढवा परिसरातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कार स्टायलस या इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी (२८ जून) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.
Pune: Death toll rises to 15; search & rescue operation is underway. #Maharashtra https://t.co/sV7p2QUnuy
— ANI (@ANI) June 29, 2019
कोंढवा येथील तालाब कंपनीसमोर अल्कोंन सोसायटी आहे. या सोसायटी शेजारीच आणखी एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथील मजुरांनी अल्कोंन सोसायटीच्या पार्किंग संरक्षक भिंतीला लागून या मजुरांनी झोपड्या बांधल्या होत्या. तेथे हे राहत होते. हे मजूर प. बंगाल आणि बिहारचे असल्याचे समजते. पुण्याचे प्रशासकिय अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
या दुर्घटनेतील मृतांची नावे आलोक शर्मा वय २८, मोहन शर्मा वय २०, अजय शर्मा वय १९, अभंग शर्मा वय १९, रवी शर्मा १९, लक्ष्मीकांत सहानी वय ३३, अवधेत सिंह वय ३२, सुनिल सिंग वय ३५, ओवीदास वय ६, सोनाली दास वय २ , विमा दास वय २८, संगीता देवी वय २६ अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बिहार आणि ओडिशामधील राहणारे आहेत. या परिसरात सुरु असलेल्या बांधकामाच्या साईटवर ते काम करतात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.