HW News Marathi
Covid-19

पुणे प्रशासनाकडून ७५ नवे मायक्रो कंटेंटमेंट झोन जाहीर

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ऍक्टिव्ह कोरोनाबाधितांचा संख्या ही पुण्यात आहे. पुण्यातील या कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर थोड्याच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुण्याचा दौरा केला. दरम्यान, पुणे प्रशासनानेही आता शहरातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पुणे शहरात ७५ नवे मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा आणि मृत्युदर कमी करण्यासाठी पुणे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, आता पुणेकरांना नियम पाळणे हे अत्यंत बंधनकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू नियम पुणेकरांनी न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ७५ कंटेन्टमेंट झोन्सबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणेकरांनो लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार!

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश !

Arati More

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे !

News Desk