HW News Marathi
Covid-19

पुणे विभागातील 5 लाख 84 हजार 922 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 

पुणे | पुणे विभागातील 5 लाख 84 हजार 922 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 11 हजार 412 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 205 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 285 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.67 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 1 हजार 955 रुग्णांपैकी 3 लाख 84 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 183 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.70 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 58 हजार 172 रुग्णांपैकी 55 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 947 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 845 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 583 रुग्णांपैकी 49 हजार 992 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 761 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 416 रुग्णांपैकी 46 हजार 532 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 127 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 286 रुग्णांपैकी 48 हजार 358 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 187 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 741 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 820 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 479, सातारा जिल्ह्यात 204, सोलापूर जिल्ह्यात 88, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 155 आहे. पुणे जिल्हयामध्ये 945, सातारा जिल्हयामध्ये 93, सोलापूर जिल्हयामध्ये 83, सांगली जिल्हयामध्ये 16 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 18 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 39 लाख 85 हजार 705 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 11 हजार 412 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगात कोरोना चाचणी करण्याच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक अव्वल !

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४७, १९० वर

News Desk

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk