HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : पुण्यात आज ८० नवे कोरोना पॉझिटिव्ह, १३ जण कोरोनामुक्त

पुणे | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ४ हजारांच्या पुढे गेला आहे. राज्यात सगळ्यात जास्त कोरोनाबाधित हे सद्यस्थितीला पुणे आणि मुंबईत आहेत. दरम्यान, पुण्यात आज (२० एप्रिल) ८० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नायडू रुग्णालयात ४६, ससून १९, रुबी ५, बारती ४, डीएचएम आणि केईएम या रुग्णालयात प्रत्येकी २ तर जहांगीर आणि बुधराणीत प्रत्येकी १ एसे एकूण ८० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ६६६ झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

पण, दिलासादायक, बाब म्हणजे पुण्यात आज १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांच्या १४ दिवसांनंतरची दुसरी कोरोना टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. त्यामूळे या सगळ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याता आला आहे. आत्तापर्यंत पुण्यातील कोरोनामुक्तांची संख्या ही ६८ इतकी झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातूर ग्रामीण मतदारसंघ धीरज देशमुख यांच्यासाठी फिक्स केला, संभाजी निलंगेकरांचा खळबळजनक दावा

News Desk

हा माणूस मुख्यमंत्री पदाच्या लायक नाही – नारायण राणे

News Desk

“प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नाही तर पेशवाईला फटका”

News Desk