HW News Marathi
Covid-19

पुण्यात आज नवे २७५ कोरोनाबाधित रुग्ण

पुणे | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात आज ( ६ जून) दिवसभरात नवे २७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात नायडू-महापालिका रुग्णालये २२३, खासगी ४४ आणि ससूनमधील ०८ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या २७५ रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या ७ हजार ७२२ इतकी झाली आहे.

तसेच, शहरातील २५९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू-पुणे महापालिका २०३, खासगी रुग्णालय ४१ आणि ससूनमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मानले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसात १ हजार ६४९ स्वॅब टेस्ट नोंदवल्या गेल्या आहेत. पुणे शहराची एकूण स्वॅब टेस्ट संख्या ५८ हजार ४५५ इतकी झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय आता पर्याय उरला नाही,सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत!

News Desk

महाराष्ट्रातून आतापर्यंत २ लाख ४५ हजार कामगारांची त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी !

News Desk

पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, अमित शाह ‘रोड शो’ करतात, त्यांना कोरोना स्पर्श करत नसेल – सामना

News Desk