पुणे | पुण्यात कोरोनाचा आणखी एक पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे आता पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्ये वाढ होऊन १० वर गेली आहे. अमेरिकेतून परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज (१३ मार्च) माध्यमांशी बोलताना सांगितले. यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्ये वाढहून १७ वर आकडा गेला आहे.
#Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar: One more person found positive for COVID-19 in Pune today. The person has travel history to the US. The total number of positive cases in city reaches 10. #Maharashtra https://t.co/brB82MaoSp
— ANI (@ANI) March 13, 2020
म्हैसेकरांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात १०, मुंबई ३, ठाणे १ आणि नागपूर ३ एकून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर केली आहे. तर पुण्यात ३११ संशयित असून त्यांना देखरेखीखालील ठेवण्यात आले आहे. यावेळी म्हैसेकर म्हणले की, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवू नका, आणि जे संशयित आहेत त्यांनी खराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी माध्यमातून लोकांना केले. देशात कोरोनाग्रस्ताची संख्या ७८वर झाली आहे.
देशातील करोनाग्रस्ताची अशी आहे संख्या
देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांमध्ये केरळ आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.उत्तर प्रदेश ११, दिल्ली ७ कर्नाटक ५ , पंजाब १, लडाख ३, राज्यस्थानमध्ये दोन परदेशी पर्यटक आणि १ भारतीय, तामिळनाडू १, तेलंगणा १ आणि हरियाणा १४ हे सर्व परदेशी पर्यटकांना कोरोनाची लागण झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.