HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॅाझिटिव्ह

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाला येऊन एक वर्ष पुर्ण झाले आहे.पुन्हा हा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिवाळीनंतर डिसेंबरपर्यंत संसर्गाचा वेग मंदावला आणि या साथीवर विजय मिळवल्याचं चित्र निर्माण झालं. पण आता महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसची दुसरी लाट आल्याचं केंद्रीय पथकाने म्हटलं आहे. पुण्यामध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.त्यातच कोरोना काळात मोठी प्रशासकीय जबाबदारी पेलणारे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

सौरभ राव यांच्यावर पुण्यासह कोल्हापूर ,सातारा ,सांगली ,सोलापूर या 5 जिल्ह्यांची जबाबदारी आहे. सध्या राव हे विभागीय आयुक्त पदावर कार्यरत आहेत.सौरभ राव यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर “मराठी भाषा गौरव दिन” होणार साजरा

News Desk

राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याची १३ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

Aprna

मराठा आरक्षणावर आज होणार अंतिम निर्णय

News Desk