HW News Marathi
महाराष्ट्र

‘पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईलाही सेल्फीचा मोह’,फोटो सोशल मीडियात व्हायरल!

पुणे। पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची आई सेल्फी काढताना दिसत आहे.आणि त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.पुणे, 28 सप्टेंबर: मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना संक्रमणांमुळे सर्वात बाधित शहर म्हणून पुणे बरेच दिवस अव्वल स्थानावर होते. कोरोना संक्रमणाच्या काळात पुण्याचे महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. कोरोना काळातील त्यांच्या कामामुळे ते अनेकदा चर्चेतही आले होते. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

‘सरप्राईज’ देते तेव्हा… लव्ह यु आई!’

हा फोटो शेअर करताना मुरलीधर मोहोळ यांनी एक भावनिक कॅप्शन देखील लिहिलं आहे. जेमतेम आकडेमोड येणाऱ्या आईनं अचानक ‘चल रे सेल्फी काढू’ असं म्हटल्याने मोहोळ यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या आईसोबतचा हा अविस्मरणीय क्षण ट्विटरवर शेअर करत, आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘जेमतेमच अक्षर ओळख असणारी माझी आई ‘चल रे सेल्फी काढू’ म्हणून ‘सरप्राईज’ देते तेव्हा… लव्ह यु आई!’ मायलेकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मोदी एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा! गणपतीची आरती म्हणत चाकरमानी मुंबईहून कोकणात रवाना!

News Desk

कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं 

News Desk

पुण्यात शिवसेनेनला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता !

News Desk