HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

पुणे | पुण्यात सामान्य नागरिकांसोबत आता नगरसेवक, आमदार यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. राहुल कुल यांचा कोरोना रिपोर्ट आज (७ जुलै) पॉझिटिव्ह आला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आमदारही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

“डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझी कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. सुदैवाने माझ्या संपर्कात असलेले माझे कुटुंबीय, कार्यालयातील सहकारी यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून योग्य उपचार सुरु आहेत” असे सांगत कुल यांनी समर्थकांना काळजी न करण्याचे आवाहन केले.

 

“संचारबंदी दरम्यान स्थानिक प्रशासनाशी समन्वय, कोरोना संदर्भात विविध उपाययोजनांसाठी बैठका आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करताना अनेकांशी संपर्क येत होता. जरी योग्य ती काळजी घेत असलो, तरीही कोरोना संक्रमणाचा धोका होताच. परंतु दौंड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार पाडताना, लोकांच्या समस्या सोडवताना हे क्रमप्राप्त होते” असे राहुल कुल यांनी लिहिले आहे.

Related posts

चोरलेल्या दुचाकी विहीरीत टाकून पोलीसांना गोंगारा

News Desk

देशात २४ तासांत ४९,३१० रुग्ण आढळले, तर ७४० जणांचा झाला मृत्यू

News Desk

विनाकारण बाहेर निघाल तर निघेल गाढवावरून धिंड, गावकर्‍यांनी घेतला एकमुखाने निर्णय