HW News Marathi
महाराष्ट्र

TET Exam Scam : पुणे पोलिसांकडून कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

मुंबई | शिक्षण पात्रता परीक्षा घोटाळ्याप्रकरणी (टीईटी) पुण्याच्या पोलिसांनी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकरांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात होते. यानंतर न्यायालयाने खोडवेकरांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. टीईटी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात पुणे सायबर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतरही कारवाई केली आहे. 

शिक्षण परिषदेचे निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या सांगण्यावरून जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर पुन्हा एकदा टीईटी परीक्षा घेण्यासा ब्लॅकलिस्ट कंपनी जीए टेक्नॉलॉजीज यांच्याकडे टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारीदेण्यात आली होती. हे करण्यासाठी खोडवेलकरांना पैसे मिळत असल्याचे पोलीस तपासातून माहिती मिळाली आहे. यानंतर पोलिसांनी खोडवेकरांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

दरम्यान, खोडवेकरांना २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते खोडवेकर हे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते. टीईटी घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक अश्विनीकुमार यांना अटक करण्यात आली आहे. तसेच राज्यातील परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे, शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर आणि  संजय शाहूराव सानप यांना अटक करण्यात आली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार

News Desk

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर – महापौर

News Desk

‘…तेव्हा सोनू सूद कोणाचे होते?’, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

News Desk