HW News Marathi
महाराष्ट्र

TET Exam : पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

मुंबई | महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केले आहे. सुपेंना म्हाडा पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुपे हे टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांकडून पैसे घेऊन पास केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या अटकेत असलेले डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यामुळे त्यांनी सुपेंना काल (१६ डिसेंबर) चौकशीसाठी बोलविले होते. सुपेंची चौकशी केल्यानंतर त्यांना आज (१७ डिसेंबर) अटक करण्यात आली आहे.

सुपेंना पुण्याच्या सायबर कार्यालयात त्यांची चौकशीकरून त्यांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा परीक्षा पेपर फुटीनंतर सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्याआहेत. यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केल्यानंतर जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील जवळपास २० जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी दिली होती. आणि या कंपनीकडून राबवलेल्या सर्वच भरती प्रक्रियांमध्ये संशय निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रमुख प्रितेश देशमुख यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना अटक केली.

सुपेंना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलिसांना शनिवारी रात्री विश्रांतवाडीमधून दोन दलालांना अटक केली तर औरंगाबादमध्ये आणखी दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये पोलीस चौकशी करीत आहेत. या प्रकरणात येत्या काही दिवसात अजून काही अधिकारऱ्यांच्या चौकशी करण्यात येणार असून अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाझे प्रकरणात सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची भुमिका घेतली त्याची ही प्रतिक्रिया – जयंत पाटील

News Desk

दूध आंदोलनासाठी काढलेला भाजपचा मुहूर्त चुकला – हसन मुश्रीफ

News Desk

पवई पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा; राऊतांचा सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna