पुणे | महाराष्ट्रामधील पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. राज्यातील दाम्पत्यांना कोरोनाची बाधा झाली होती. या दाम्पत्यांवर पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. मात्र, आता या दाम्पत्याची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ही आल्याने ते दाम्पत्य बरे झाले असून आज (२५ मार्च) त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी आहे.
Pune: Two people who were found positive two weeks back, have now tested negative(twice) for #COVID19, both to be discharged from hospital today. These were the first two cases of Maharashtra
— ANI (@ANI) March 25, 2020
देशात कोरोना व्हायरसचे ५३६ रुग्ण आढळून आले आहेत तर १० जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले. राज्यातील हा आकडा १०७ च्या पुढे गेला आहे. मात्र, यातील २ जण वगळता इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. हे दाम्पत्य दुबईहून परतलेल्या यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर होळीच्या दिवशी त्यांना नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. चौदा दिवसांनी त्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांचे नमुने पुन्हा एकदा घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.
२१ दिवस लॉकडाऊन
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात पुढील २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल (२५ मार्च) केली. जर या २१ दिवसांत कोरोनाचे संसर्ग रोखले नाही तर मोठा अनर्थ होईल, अशीही भीतीही त्यांनी देशवासियांना संबोधित करता व्यक्त केली. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही पण काळजी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये. स्वत:चे आणि कुटुंबाचे आरोग्य तुमच्याच हाती आहे असे, आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं.
राज्यातील कोरोना बाधित असा आहे आकडा
मुंबई शहर आणि उपनगर – ४१
पिंपरी चिंचवड मनपा – १२
पुणे मनपा – १९
नवी मुंबई – ५
कल्याण – ५
नागपूर – ४
यवतमाळ – ४
सांगली – ४
अहमदनगर – ३
ठाणे – ३
सातारा – २
पनवेल- १
उल्हासनगर – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
वसई-विरार – १
एकूण – १०७ कोरोनाबाधितांचा आकडा
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.