HW News Marathi
महाराष्ट्र

माजी राष्ट्रपीत प्रतीभाताईंनी पतंगराव कदम यांचे अंत्यदर्शन घेतले

पुणे | माजी राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या सिंहगड बंगल्यावर जावून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. गेले काही दिवसापासून ते आजारी होते. शुक्रवारी लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेताला. त्यांचे पार्थिव पहाटे मुंबईहून पुण्याला निघाले असून सकाळी साडे सातच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या पुण्यातील सिंहगड बंगल्यात पोहचले. पुण्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते सुरेश कलमाडी यांनी त्यांच्या पार्थिवचे अंत्यदर्शन घेतले.

पुण्यातील भारतीय शैक्षणिक परिसरामध्ये पतंगराव कदमांचे पार्थिव दुपारी १२ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव सांगलीच्या दिशेने रवाना होणार आहे. पतंगराव कदम त्यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगीमध्ये असलेल्या सोनहिरा साखर कारखाना परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीनंतर राज्यातील कॉलेज सुरू होण्याबाबत निर्णय घेऊ – उदय सामंत

News Desk

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली ‘ही’ महत्त्वाची बाब !

News Desk

कंगना देशभक्त ठरत असेल तर Y कशाला तिला Z सुरक्षा द्या – विजय वडेट्टीवार

News Desk