पुणे | राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटताना पहायला मिळत आहेत. पुणे येथील चाकणमध्ये सोमवारी अनेक वाहने जाळण्यात आली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ४ ते ५ हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाने आपल्या मागण्यांसाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंदोलन सुरु केले होते. २ तासांनंतर तोडफोडीला सुरुवात झाली आणि त्यानंतर वाहनांना आग देखील लावण्यात आली. परीसरात वाढलेला गोंधळ पाहून त्या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली होती.
Pune: Two cases have been registered against 4000-5000 agitators for violence that broke out during protests over #MarathaReservation in Chakan area yesterday. #Maharashtra
— ANI (@ANI) July 31, 2018
चाकण मधील या जाळपोळसत्रात बाहेरच्या लोकांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस याप्रकरणी व्हायरल फोटो, व्हीडिओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.