नवी दिल्ली। पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरु झाली आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत चालला असून आता पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. काँग्रेसच्या कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हटवण्याची तयारी सुरू होती. यावेळी ते अस देखिल म्हणाले की, मला वेळोवेळी अपमान करण्यात आल आहे.
काँग्रेस सोडण्याची धमकीही दिली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना फोन करून राजीनाम देण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याशीही त्यांनी बोलणी केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, अशीही चर्चा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकल्यास काँग्रेस सोडण्याची धमकीही दिली आहे. बातम्या येत आहेत की त्यांनी हायकमांडला सांगितले आहे की जर पक्षाचा हा त्रास संपला नाही तर ते पक्षही सोडतील.
CM Captain Amarinder Singh has met Punjab Governor and submitted his and his council of ministers’ resignation. He will address the media at the Raj Bhavan gate in a few minutes from now: Raveen Thukral, Media Advisor to Punjab CM pic.twitter.com/VwxpGruX74
— ANI (@ANI) September 18, 2021
सोनिया गांधीना फोन, बैठकीवर नाराजी
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरिंदर सिंग यांनी आज सोनिया गांधींना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांना विश्वासात न घेता आमदारांची बैठक बोलावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला असं अडगळीत टाकणार असतील तर मुख्यमंत्रीपदी राहण्यास आपण इच्छूक नाही, असं सिंग यांनी सोनिया गांधींना फोन करून सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एक पत्र काँग्रेसच्या अध्यक्षांना पाठवले
पंजाबमध्ये कॅप्टन यांच्या विरोधात 40 आमदारांनी नाराजी व्यक्त करणारे एक पत्र काँग्रेसच्या अध्यक्षांना पाठवले. त्याचाच विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याच निमित्तीने चंदीगड येथे पंजाब काँग्रेस भवनात आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. तत्पूर्वी पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीची माहिती रावत यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर जारी केली. याच बैठकीनंतर अजय माकन आणि हरीश चौधरी यांना केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.