HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावर नाराजी व्यक्त केल्यानंतर वसंत मोरेंना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मदिशीवरील भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावा, या भूमिके नाराजी व्यक्त केल्यानंतर वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले. वसंत मोरे यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. यापूर्वी वसंत मोरेंनी पुण्याच्या उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले. तेव्हापासून पक्षश्रेष्ठी त्यांच्या भूमिकेवर नाराज असून वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देणार चर्चेला उधाण आले. वसंत मोरेंनी पक्षात राहून काम करणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. 

वसंत मोरेंच्या जागी मनसे पुणे शहर प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेल्या साईनाथ बाबर यांची खास शैलीत ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. वसंत मोरेंनी ट्वीट करत म्हटले, “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!” मोरे हे गेल्या १० वर्षापासून कात्रज प्रभागातून नगरसेवक आहेत. मोरे हे मराठा असूनही त्यांच्या प्रभागातील मुस्लिम मतदारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळांने घेतली पोलिसांची भेट

Aprna

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक ! – नाना पटोले

Aprna

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; तणावाचे वातावरण

News Desk