HW Marathi
महाराष्ट्र

गौरी गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी ७ दिवस करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

सिंधुदुर्ग | यंदाच्या कोरोना संकटामुळे गणेशोत्सवावर विघ्न आले आहे. काही मंडळे गणपती बसवणार नाही आहेत. अशा काळात कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अशा या सणाबाबतीत काही नियम बदलले आहेत.

कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांवरून ७ दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर खासदार विनायक राऊत यांनी गणेश भक्तांच्या भाविकांना तडा जाणार नाही अशी कोविड नियमावली असावी असे सुचविले.

सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता शांतता समितीची बैठक सिंधुदुर्गमध्ये झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ग्राह्य धरता येणार नाही ते रद्द झाले असे समजा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. गणेश चतुर्थी सणात येणाऱ्या गणेशभक्तांना सुलभ पद्धतीने ई पास मिळवता यावेत, त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी, येण्यासाठी बस सुविधा करावी, महामार्गावर टोल फ्री योजना आखावी आणि मुंबई गोवा महामार्ग योग्य तिथे दुरुस्ती करावी याबाबत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून भूमिका ठरविली जाईल असे पालकमंत्री सामंत यांनी या बैठकीत सांगितले.

गौरी-गणपती सणाच्या काळात किती लोकांना आगमन,भजन, प्रतिष्ठापणा व विसर्जन करताना सहभागी होता येईल, याबाबत योग्य ती भूमिका घेऊन शिफारस करायला हवी. गणपती सणाच्या निमित्ताने पारंपारिक भजन, आरती आपण थांबू शकत नाहीत, त्यामुळे त्याबाबत निर्णय घेताना गणेश भक्तांचा गैरसमज वाढणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

Related posts

कल्याण-डोंबिवलीचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्याचे महानगरपालिकाच्या आयुक्तांचे आदेश

News Desk

आता कोरोनाच्या भितीला झुगारून काम करावे लागेल, रोहित पवारांचे युवकांना आवाहन

News Desk

मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा काळा बाजार केल्यास होणार कारवाई

अपर्णा गोतपागर