मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्यामुळे गावाच्या दिशेने निघाले आहे. गावाकडे आलेल्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले जात आहेत. या शिक्क्यांमुळे हातावर रिअॅक्शन झाल्याची घटना घडली आहे. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
This is what is happening with stamps that people r gettin while crossing the kharepatan border Sindhudurg!
This girl from devgad got the stamp yesterday and this morning her hand turned like this!
The Maha Gov is just hurting us in different ways!! Fed Up!! pic.twitter.com/2NorRewzTX— nitesh rane (@NiteshNRane) May 16, 2020
“खारेपाटन सिंधुदूर्ग सीमेवर एका मुलीच्या हातावर शिक्का मारला गेला. ती मुलगी देवगडची राहणारी आहे. दुसऱ्या दिवशी तिचा हात काळा झाला, सुजला आणि त्यावर फोडही आलेत. त्या शिक्क्याची ती रिअॅक्शन असल्याचे बोलले जाते. सरकारचे काम हे लोकांना दुखावणारे आहे, या हाताचा फोटो नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर ट्वीट केला आहे.
कोरोनाच्या परिस्थित सध्या एवढ्या मोठ्या संख्येने हातावर शिक्के मारले जात असल्यामुळे त्याचा परिणाम झाला असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकांच्या शिक्के मारताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे बोले जाते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.