HW News Marathi
देश / विदेश

“तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते”

नवी दिल्ली | कोरोना रोगामुळे संपूर्ण जग त्रासलेलं आहे. या सगळ्यामध्ये जनतेला सतावणारा अजून एक मोठा प्रश्न म्हणजे इंधन वाढीचा. दिल्लीत पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८९.५३ रुपयांवर पोहोचले आहे’ अशी बातमी शेअर केली आहे. इंधन दरवाढीमुळे वाढत्या कराचा बोजा सामान्यांनवर पडत आहे. त्यावरुन राहुल गांधींनी टीका केली आहे.

तुमची गाडी पेट्रोल चालत असेल किंवा डिझेलवर, मोदी सरकार कर वसुलीवर चालते!

काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच विरोधी पक्षावर टीका करत असतात. यावेळी त्यांनी इंधनाचे दर सतत वाढत असल्यामुळे मोदीसरकारवार टीका केली आहे. “तुमची गाडी पेट्रोल चालत असेल किंवा डिझेलवर, मोदी सरकार कर वसुलीवर चालते!,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेस पक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहे आणि ११ जून रोजी पक्षानेह त्याविरोधात देशव्यापी आंदोलनही केले होते.

पेट्रोलच्या भावात सातत्याने होत आहे वाढ

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार आज (७ जुलै) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३१ ते ३५ पैसे आणि डिझेलच्या दरात १५-२३ पैसे वाढ झाली आहे. आजच्या वाढीसह राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या पुढे गेली आहे. यासह, देशातील चार मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती याआधीच १०० च्या पुढ्या गेल्या आहेत. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी राष्ट्रपती संघाच्या मुख्यालयात आपले डोके टेकवतात

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने नागेश्वर राव यांना दिली कामकाज होईपर्यंत थांबण्याची शिक्षा

News Desk

‘हिंदी ही राष्ट्रभाषा’ राज्य सरकारच्या ‘या’ जीआरमुळे नवा वाद

Aprna