HW News Marathi
Covid-19

राहुल गांधींचे विधान जबाबदारीपासून पळणारे | देवेंद्र फडणवीस

मुंबई | आमचे या सरकारमध्ये ऐकले जात नाही, राहुल गांधीजी यांचे आजचे विधान हे विधान आश्चर्यकारक आहे. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात आल्यानंतर हे खापर शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर फोडले जात आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे, से मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनी मांडले. फडणवीस यांनी आज (२६ मे) व्हिडिओ पत्रकार परिषददरम्यान झाल्या आहेत.

फडणवीस म्हणाले, “तुम्ही सरकारमध्ये आहात, बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे जबाबदारी झटकता येणार नाही.राहुल गांधींचे वक्तव जबाबदारी झटकणारे आणि सरकारची साथ सोडणारे दिसते. सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्ण संख्या आणि मृत्यू यात मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ २९०० चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी ३२ टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

 

  • राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल
  • सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत
  • महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ. आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ 2900 चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी 32 टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत: देवेंद्र फडणवीस
  • आम्ही सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत नाही, पण हे सरकार अंतर्गत विरोधाने पडणार, असा विश्वास फडणवीस म्हणाले
  • राज्यात काँग्रेसचे ऐकले जात नाही हा फक्त बहाना आहे. परिस्थिती हाता बाहेर जात असल्याचे काँग्रेसचा कांगावा करत आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीचे पूर्ण खापर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनवर फोडले आहे. आणि काँग्रेस पळवाट काढत आहे. राहुल गांधींनी आज केले वक्तव्य हे बेजबाबदार आहे. असे मत फडणवीस यांनी माडले
  • आमचे सरकारमध्ये ऐकले जात नाही, हे राहुल गांधी यांच्या आश्यर्यकारक आहे.
  • केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई/गृहनिर्माण/डिस्कॉम/नरेगा/आरआयडीएफ/कॅम्पा एम्पॉयमेंट/स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान ७८ हजार ५०० कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील
  • ४ हजार ५९२ कोटी अन्नधान केंद्रकडून दिले
  • जीएसटीचा नोव्हेबरपर्यंत राज्याला दिला आहे, नोव्हेंबर नंतरचा निधी जीएसटी काऊंसिल घेणार
  • शेतीसाठी केंद्राने राज्याला ९ हजार कोटींचा निधी दिला, अन्न, औषध, शेती अशा प्रत्येक घटनांसाठी केंद्राकडून निधी
  • राज्य सरकारला केंद्र सरकारने एकूण २८ हजार १०४ कोटी रुपये दिले
  • एप्रिल आणि मे आगाऊ निधी केंद्राने दिला आहे
  • प्रधानमंत्री किसान सन्मान योजना १७२६ कोटी, जनधन – महिलांच्या खात्यात १३०८ कोटी आतापर्यंत गेले, अधिक ६५० कोटी जातील. विधवा, ज्येष्ठ नागरिक – १६ कोटी. असे ३८०० कोटी रुपये थेट ट्रान्सफर केले
  • पीपीई किट आणि एन ९५ मास्कचा पुरवठा केला
  • उज्ज्वा योजनेतून १ हजार ६०० कोटी
  • केंद्राने राज्याला ४ हजार ५०० कोटी रुपये दिले आहे
  • केंद्र सरकारकडून मोफत धान्य
  • श्रमिक ट्रेनसाठी ३०० कोटी रुपये दिले आहे
  • केंद्राने राज्याला अन्नधान्यसाठी ४ हजार
  • मंजुरांच्या छावण्यासाठी १ हजार ६११ कोटी रुपये दिले
  • महाराष्ट्रातून जवळपासू ६०० ट्रेन सोडल्या आहेत
  • केंद्र सरकारने वेगवेगळ्या मार्गाने राज्य सरकाला मदत केली आहे
  • केंद्राने राज्याला दिलेल्या मदतीबदल बोलणार, महाराष्ट्राल केंद्र सरकार काही देत नाही, अशी प्रीतमा मलित करण्याचा विचार करते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारचा “ब्रेक द चेन”चा नारा ! आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

News Desk

ठरलं ! उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेचे ९ आमदार ‘या’ दिवशी घेणार आमदारकीची शपथ

News Desk

मुंबईत धारावी नाही तर ‘हा’ परिसर ठरतोय ‘कोरोना हॉटस्पॉट’

News Desk