HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

खासगी डॉक्टरांनाही वैद्यकीय उपकरण देण्यासाठी राहुल शेवाळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अथक परिश्रम करत आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन चाचण्या घेणे, कम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून अनेक खासगी डॉक्टर काम करत आहेत. या डॉक्टरांच्या सुरुक्षिततेसाठी पीपीई किट्स आणि काही वैद्यकीय उपकरणांची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले आहे.

अनेक खासगी डॉक्टर्स पालिकेच्या समन्वयातून घरोघरी जाऊन नागरिकांच्या चाचण्या करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत हे खासगी डॉक्टर्स पालिकेच्या समन्वयातून मुंबईत कोरोनाचे जे हॉटस्पॉट आहेत त्या बागात जाऊन लोकांच्या चाचण्या करत आहेत. त्यामूळे त्यांना विमा कवच देण्याची घोषणा केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण आहे. त्याचसोबत, कोरोना युद्धाचा सामना करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्यावे. विम्याबरोबरच खासगी डॉक्टरांना पीपीई किट आणि वैद्यकीय उपकरणे देण्याची मागणीही खासदार शेवाळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Related posts

कर्नाटकामध्ये लोकशाही आणि प्रामाणिकपणाचा पराभव !

News Desk

९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात

News Desk

माझगाव आगीतून तिरंगा सुरक्षित खाली उतवणाऱ्या कुणाल जाधवांचा मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार

rasika shinde