मुंबई | रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव मागवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने काल (१ जुलै) ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. देशातील रेल्वेच्या जाळ्याला १२ कलस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. या १२ क्लस्टरमध्ये १०९ जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार आहेत.
प्रत्येक रेल्वे कमीतकमी १६ डब्ब्यांची असेल. तर या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा १६० किलोमीटर प्रति तास इतका असेल. या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनी खरेदी करेल. तसेच, देखरेखीचा खर्चही संबंधित कंपनी करणार आहे. रेल्वे केवळ गार्ड आणि मोटरमन पुरवणार आहे.
या कामासाठी खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ३० हजार कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी गाड्या चालवण्याचा हा खासगी गुंतवणुकीचा पहिला उपक्रम असून या उपक्रमाचे उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञानास चालना देणे हे आहे.
Railways invites Request for Qualifications for private participation for passenger train operations on 109 pairs of routes through 151 modern trains.
This initiative will boost job creation, reduce transit time, provide enhanced safety & world-class facilities to passengers. pic.twitter.com/uG2dhdbG3b
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.