HW News Marathi
महाराष्ट्र

हाताला दुखापत असूनही राज ठाकरे बैठकीला आले!

मुंबई | राजकारणात पुन्हा एकदा मनसे सक्रिय होताना दिसत आहे. आज (१२ जानेवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. आज (१२ जानेवारी) आगामी निवडणुका लक्षात घेता बांद्राच्या MIG क्लबमध्ये रणनिती ठरवण्यासाठी सरचिटणीस, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. दरम्यान, राज ठाकरे यांना दुखापत होऊनही त्यांनी या सभेला हजेरी लावली होती. राज ठाकरे हे काल (सोमवारी) संध्याकाळी टेनिस खेळत होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. ही दुखापत काळजी करण्याइतकी मोठी नाही. त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावलं आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये सरशी मिळवण्याच्या उद्देशानं पक्षाची पुढील रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचं म्हटलं गेलं. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीसाठी राज ठाकरे पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पोहोचले. सोमवारी सायंकाळी टेनिस खेळताना त्यांना ही दुखापत झाल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर डॉक्टरांकडे गेलं असता त्यांना घरीच राहून आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. पण, पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी हाताला प्लॅस्टर करुन डाव्या हाताला दुखापत असतानाही राज ठाकरे बैठकीच्या ठिकाणी पोहोचले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंना मोठा धक्का! सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला

Aprna

६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच! – नाना पटोले

Aprna

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार?

News Desk