HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘अरुणोदय झाला’ गाणे राज ठाकरेंनी केले ट्विट

नवी मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४वा वर्धापन दिन आज (९ मार्च) साजरा होत आहे. हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर मनसेचा हा पहिला वर्धापन दिन सोहळा आहे. हा सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर असून नवी मुंबईत होत आहे .नवी मुंबई आणि औरंगाबाद पालिकांची निवडणूक लवकरच होणार आहेत. नवी मुंबई पालिका निवडणुकीत मनसेची भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसैनिकांना संबोधित करताना नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेचा वर्धापन दिन सोहळा नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे. दरम्यान, वर्धापन दिनानिमत्ताने राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील रॅली निघणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून मनसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मनसेचा वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंनी ‘अरुणोदय झाला’ गाणे ट्विट करत सर्व मनसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच राज ठाकरे वर्धापन दिना निमित्ताने मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’ही आज जाहीर होणार आहे. ठाकरे सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात येणार आहे. या शॅडो कॅबिनेटमध्ये २५ जणांचा समावेश करण्यात येणार असून यात यामध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि अभिजीत पानसे या मर्जीतल्या नेत्यांनाच स्थान दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत! – नाना पटोले

Aprna

शरद पवारांच्या पुस्तकाच्या एका पानातून भाजप राजकारण करतयं,रोहित पवारांचा फडणवीसांवर आरोप !

News Desk

ही यात्रा कोणत्याही पदासाठी नसून महाराष्ट्र घडविण्यासाठी !

News Desk