HW News Marathi
महाराष्ट्र

“मी मास्क घालतच नाही…!” – राज ठाकरे

मुंबई | मराठी राजभाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. परंतु आजही ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले. ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी दादूचं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?, असा प्रश्न आता लोक विचारत आहेत.शिवाजी पार्कात मनसेने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राज ठाकरे यांनी सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. मात्र राज ठाकरे यांनी मास्क लावलेला नव्हता.

मी मास्क घालतच नाही…!

कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बहुतेकांनी मास्क लावलेला होता. परंतु राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. साहजिकच कॅमेरे राज ठाकरे यांच्यावर खिळले होते. पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. राज ठाकरे या आधीही अनेक कार्यक्रमाला गेले होते. मात्र, त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात मास्क लावलेला पाहायला मिळाला नाही, त्यामुळेच लोकांमध्ये त्याची चर्चा कायमच होताना दिसली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात 

News Desk

‘राज्यपाल महाराष्ट्राची मोठी समस्या’; शिवसेनेची टीका

News Desk

अजित पवारांची ‘तंबी’, दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील!

News Desk