HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षातील गद्दारांची दोन दिवसांत हकालपट्टी करणार !

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (१५ फेब्रुवारी) राज ठाकरेंनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहे. सध्या राज ठाकरे आणि मनसे पक्षाच्या उभारणीसाठी मैदानात उतरले आहेत. औरंगाबादच्या दौऱ्यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बोलत होते. ‘मी पक्षाच्या बैठकीसाठी आलो आहे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. आपल्याला जोरात काम करायचं आहे. पण काही लोक चुकीच्या बातम्या देतात. आपलेच कार्यकर्ते गद्दार आहेत. त्यांची नावं मला समजली असून मी त्यांना पक्षातून हद्दपार करणार’ असल्याचं राज ठाकरे म्हणाले. ‘गद्दारपणा करणाऱ्यांना पक्षात जागा नाही त्यांची हकालपट्टी मी करणार आहे. 2 दिवसात त्यांना पक्षातून हकालणार आहे’ अशा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरेंनी काल (१४ फेब्रुवारी) पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला. या संवादात औरंगाबादच्या नामकरणाबाबात प्रश्न विचारला असता औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोलाही लगावला. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्यासाठी मनसे आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचे चिन्हेही दिसून येत आहेत.

दरम्यान, मराठवाड्याच्या या दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाहीआमंत्रित करण्यात आले होते.

दरम्यान, मनसेला शिवसेनेचे उष्ट खाण्याची सवयच लागली आहे असे सांगत शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मनसेवर निशाणा साधला होता. तर गुलाबराव पाटलांच्या या टोल्यावर मनसेचे अविनाश जाधव यांनी, मागच्या ५ वर्षात शिवसेना सत्तेत होती, आताही सत्तेत आहे पण औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची हिंमत झाली नाही आणि आम्ही त्याचा उच्चार केला तर त्याची एवढी धास्ती घेतली असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संकेत येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील पर्यटनस्थळे पुर्ण क्षमतेने सुरु, हॉटेल ११ पर्यंत सुरु राहणार, अजित पवारांची घोषणा!

News Desk

…मग सभागृहात अंधार कसा ? | अजित पवार

News Desk

राम शिंदेंच्या चौंडी गावात रोहित पवारांच्या पॅनलने मारली  बाजी

News Desk