HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर

मुंबई | आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरु केली आहे.  याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या दौऱ्यावेळी राज ठाकरे फक्त निवडक पदाधिकाऱ्यांशीच चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसेत इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. काही दिवसांआधी नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला आहे. नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला होता.

Related posts

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आघाडीचा असेल !

News Desk

बेटी पढाओ भाजपा से बचाओ | सुधांशु भट्ट

News Desk

अजित पवारांचा एक फोन आणि काँग्रेस आमदारांचे उपोषण मागे…!

News Desk