HW News Marathi
महाराष्ट्र

राज-उद्धव ठरवून आले एकत्र

पी.रामदास
मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपची ताकद वाढल्याचे लक्षात येताच शिवसेनेने हादरून गेली. त्यांनी दोन पावलं पुढे टाकत आपल्याच बंधुच्या पक्षातून सहा उमेदवार आयात केले. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. काहीजण म्हणतात शिवसेनेने मनसे फोडली. काही म्हणतात तीन कोटी रुपये देऊन उमेदवार खरेदी केले. काहीजण भलताच अंदाज काढत आहेत. परंतु हे सर्व नाट्य एका रात्रीतून घडल्यामुळे त्याविषयी शंका घेण्यास वाव आहे. कदाचित उद्धव राज यांनी ठरवून हा गेम केला असावा?

एकाच रात्री सर्व सहा नगरसेवकांना शिवसेनेने कसे मॅनेज केले. त्यांना कुठे व कोणी प्रत्येकी तीन कोटी रुपये पुरवले. त्याची कुणकुण मनसेच्या पदाधिका-यांसही किरीट सोमय्या यांनी कशी लागली. या प्रश्नांची उत्तरे सापडत नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण एका रात्रीतून प्लॅन करण्यात आल्याचा संशय आहे. हा प्लॅन खुद्द उद्धव व राज यांनी ठरवल्याचे बोलले जात आहे. कारण दोघांच्या सहमतीशिवाय एका रात्रीतून नगरसेवक दुस-या पक्षात जाण्याचा निर्णय घेणे शक्य नाही.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राज यांनी उद्धव यांनी हात देण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्धव यांनी तो झिडकारला होता. परंतु भाजप महापालिकेत सत्तेची स्वप्न पाहत असून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असल्याचे भांडूप पोटनिवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाल्यानंतर उद्धव यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षी दूर ठेवत सरळ सरळ राज यांच्याशी हातमिळवणी करून सहा नगरसेवक आपल्या गोटात ओढले आहेत.

राज-उद्धव यांच्या राजकीय मतभेद आहेत. ते न पटल्याने राज यांनी मनसेची वेगळी चुल मांडली. पंरतु ही चुल काही केल्या पेट घेत नसल्याचे दिसताच राज यांनी एक पाऊल मागे टाकण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यात शिवसेना भाजपसोबत असली तरी विरोधकांची भूमिकेत ती वावरत आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर तर दोन्ही पक्षांत मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या प्रत्येक बाबींवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नव्हती. थेट मोदींवर टीका करण्यास शिवसेना मागेपुढे पाहत नाही. महागाई, नोटबंदी, जीएसटी आदी मुद्यावर केवळ शिवसेना भाजपवर हल्लाबोल करत आली. तशीच टीका राज यांनीही सुरू केली होती. राज व उद्धव यांचे टीकेचे अनेक मुद्दे समान वाटत होते. नुकत्याच घडलेल्या एलफिन्स्टन रेल्वे अपघातानंतर राज यांनी मोर्चा काढून प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांची हकालपट्टी करण्यात आली. याचे श्रेय मनसेचे असले तरी शिवसेनेमुळे हे शक्य झाल्याचा दावा सामनातून करण्यात आला. खरे पाहिलं तर दोघा भावामध्ये केवळ मराठी माणूस त्यांचे प्रश्न आदी मुद्यावर राजकारण सुरू आहे. एका मुद्द्यावर दोन भावांनी दोन ठिकाणी बोलण्याऐवजी एकत्रीत बोलल्यास मोठा आवाज होईल, आणि मराठी माणसांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न हाणून पाडता येईल, या एकमेवळ सूत्रावर राज व उद्धव एकत्र आले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या दुसरा समान धागा काहीच नाही. त्यांच्या पक्षाचा उद्देश यापेक्षा वेगळा दिसत नाही.

म्हणूनच ३५ हजार कोटी रुपये बजेट असलेल्या या महापालिकेत मराठी माणसाव्यतिरिक्त कोणी घुसखोरी करणार असेल तर आम्ही आमच्यातील वाद दूर ठेवून एकत्र येऊ शकतो, हेच या दोघा भावांनी या घडामोडीवरून दाखवून दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हीच ती वेळी, होय… मी विधानसभा निवडणूक लढविणार !

News Desk

उत्पादन वाढीसाठी बांधावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करा! – विजय वडेट्टीवार

Aprna

महाराष्ट्रात अजून 25 -30 वर्ष भाजपची सत्ता येणार नाही; संजय राऊतांचा दावा

News Desk