HW News Marathi
महाराष्ट्र

कोणी ध चा म करायला नको म्हणून आधीच सांगतो पवार साहेबांना भेटणार आहे, अपक्ष आमदाराचे स्पष्टीकरण

सोलापूर | विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले सोलापुरातील अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना भेटणार आहेत. त्यामूळे चर्चेल उधाण आले आहे. दरम्यान,कोणी ध चा म करायला नको, म्हणून मी आधीच सांगतो, की पवार साहेबांना भेटायला जाणार आहे, असं राऊत यांनी आधीच सांगीतले आहे.

वरिष्ठ पातळीवर राजकारणात आमदार कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहिलं जात नसल्याचं राजेंद्र राऊत म्हणाले. बार्शी शहर आणि तालुक्याच्या विकास कामासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

तिन्ही नेत्यांची भेट घेऊन बार्शी तालुक्यासाठी निधी आणि अनुदान उपलब्ध करुन देणार आहे. विकासाची अडचण असल्यास आपल्याला भेटत जा, असा शब्द शरद पवार यांनी दिल्याचा दावा राजेंद्र राऊत यांनी केला. आमदार राजेंद्र राऊत यांची देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी चांगली जवळीक आहे

बऱ्याच जणांना वाटतं सरकार नसल्यामुळे तुम्ही कामं कशी करणार? पण जो हाडाचा काम करणारा कार्यकर्ता असतो, त्याला शेवटी माहित असतं. ही सरकारी कामं आहेत, मला काय व्यक्तिगत कुठल्या सरकारकडून टेंडर घ्यायचं नाही. सरकार विरोधातलं असलं, तरी जे काही आमचे संबंध आहेत, त्यामुळे मी शरद पवारांना भेटणार आहे. बार्शी उपसा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे” असं राजेंद्र राऊत म्हणाले.

“कोणी ध चा म करायला नको, म्हणून मी आधीच सांगतो, की पवार साहेबांना भेटायला जाणार आहे. जेव्हा डॉ. पद्मसिंह पाटील निवडणुकीला उभे राहिले होते, त्यावेळी बार्शीच्या लीडवर ते निवडून आले. तेव्हा पवार साहेबांनी माझे आभार मानले होते आणि म्हणाले होते की राऊत, कुठल्या विकासकामाची अडचण आली, तर जरुर मला भेटत चला. तुम्हाला मी कामात मदत करेन. आपल्या बार्शीच्या राजकारणात जी खुन्नस किंवा कुटील राजकारणाची पद्धत आहे. ती वरील राजकारणात नाही” असंही राजेंद्र राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्यांनी पेपर फोडला ते फुटले नाहीत म्हणून…!

News Desk

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

News Desk

मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेवर भर! – मुख्यमंत्री

Aprna