HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रासाठी पुढील ८ दिवस महत्वाचे, राजेंद्र शिंगणेंनी व्यक्त केली चिंता

मुंबई | महाराष्ट्राची चिंता दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे निष्काळजी करू नका, असं सांगतानाच हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत. राज्यासाठी आगामी आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, अशी चिंता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली आहे.

राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही चिंता व्यक्त केली आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरवरून राजकारण होत आहे. मी यावर काही बोलणार नाही. हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत, असं सांगतानाच पुढील आठ दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं शिंगणे म्हणाले आहेत.

राज्यात अजून काही दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा जाणवणार!

डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, “आपल्याला लागणारं रेमडेसिवीरचं इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज १२ हजार ते १५ हजार एवढं कमी मिळालेलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे.”

“नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती. त्यावेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता.

त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंतू कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली, तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवलं आहे.” असंही डॉ.शिंगणे यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही | राज ठाकरे

News Desk

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी निमंत्रण नसेल तरीही राममंदिर भूमिपूजनाला जावं-संभाजी भिडे

News Desk

ग्रामपंचायतीवर राजकीय पक्ष्याचा कार्यकर्ता नेमणे म्हणजे लोकशाहीचा खून- आ. सुरेश धस

News Desk