HW News Marathi
Covid-19

  लस कधी येणार ते माहिती नाही पण…राजेश टोपेंची महत्वाची माहिती

मुंबई | देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी कोरोना लस निर्मितीकडे सरकारसह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकताच कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेट देत लसीचा आढावा घेतला आहे. यावर लस कधी येणार ते माहिती नाही, पण राज्य सरकारकडून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी लसीचा आढावा घेतला आहे. ती लस कधी येणार ते माहिती नाही. पण लस आली तर तिचं योग्य नियोजन सरकार करत आहे. कोल्ड स्टोरेज वाढवणं, त्याची साठवण क्षमता यावर सरकारची तयारी सुरु आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व खबरदारी घेतली जात असल्याचं टोपे म्हणाले आहेत.

कोरोनाची लस आल्यानंतर ती कोणाला देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यात प्रथम श्रेणीत ती लोकप्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यावर, अशी कुठलीही मागणी झालेली नाही. लस आल्यानंतर ती पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनाच देण्यात येईल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोरोना लस कुणाला द्यावी, त्याचं वर्गिकरण कसं व्हावं याचं संपूर्ण नियंत्रण केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ११,५१४ नवे रुग्ण तर १०,८५४ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

News Desk

मी परळीसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार !

News Desk