HW News Marathi
Covid-19

लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय – राजेश टोपे  

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन लावलं जातंय की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याची निर्देशही दिले होते. मात्र महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आनंद महिंद्रांसारख्या उद्योजकांनी लॉकडाउनला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. यादरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनसंबंधी मोठं विधान केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत तेव्हा वाढणारे रुग्ण, आपल्याकडे असणारी संसाधनं या सगळ्याचं आपण मोजमाप करत राहतो. वाढत राहणारी संख्या पुढच्या आठवड्यात किती असेल त्यावेळी किती बेड उपलब्ध असतील याचा अभ्यास करणं यंत्रणेची गरजच असते. त्यामुळे लॉकडाऊन हा विषय कोणालाच मान्य नाही, आवडत नाही, प्रियदेखील नाही. पण परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाऊन करत नसतो. तो अभ्यास कऱण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

“लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“मी अलीकडे जे पाहत आहे तिथे लक्षणं नसणाऱ्यांची काळजी वाटत नाही. पण ते होम कवारंटाइन असतात, बऱ्याच लोकांना छोटी घरं असतात. त्यामुळे ते आपल्यासोबत संपूर्ण घरालाही बाधित करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात नाही. उपचार होत नसल्याने मग त्यांची परिस्थिती बिघडते आणि त्या अवस्थे ते रुग्णालयात येतात. आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची गरज त्यामुळे वाढली आहे. त्यामुळे मी माझ्या आरोग्य विभागालाही आवाहन केलं आहे की, ज्यांचं घर छोटं आहे, ज्यांना विलगीकरणात राहण शक्य नाही त्यांना सरळ सरकारी सीसीसी रुग्णालयात आणलं पाहिजे. होम आयसोलेशनमध्ये ठेवू नका, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हा एक महत्वाचा बदल झाला पाहिजे. लोकांनी तो पाळला पाहिजे,” असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

लसीकरणाविषयी बोलताना विनंती करत ते म्हणाले की, “आपण देशात पहिल्या क्रमांकावर आहोत, पण आपल्याला गती वाढवायची आहे. पात्र लोकांच्या लसीकरणासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे. सामाजिक आणि राजकीय संघटनाच्या कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रावर नेत मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याच धर्तीवर आपण आपल्या ४५ वर्षापुढील लोकांना बाहेर काढून लसीकरण केलं पाहिजे. यामुळे गती वाढेल असा मला विश्वास आहे. आपलं देशप्रेम, राज्यप्रेम सिद्ध करावं”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई होणार, महापौरांचा इशारा

News Desk

यूजीसीला एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका – आदित्य ठाकरे

News Desk

अजित पवार यांनी वारकऱ्यांबाबतही राजकारण केले !

News Desk