HW News Marathi
Covid-19

राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे १५००च्या आसपास रुग्ण, राजेश टोपेंच्या केंद्राकडे ३ महत्वाच्या मागण्या

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने महाराष्ट्रात शिरकाव केलाय. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे १५०० पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

इतकच नाही तर या आजाराबाबत केंद्र सरकारकडे महत्वाच्या तीन मागण्या केल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत ६ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. त्यानंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात सध्या १५०० च्या आसपास म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती विविध कारणांमुळे कमी झाली आहे. तसंच ज्या रुग्णांच्या रक्तात आयर्न म्हणजेच फेरेटिनचं प्रमाण जास्त आहे, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका असल्याचं टोपे म्हणाले आहेत

म्युकरमायकोसिसबाबत महत्वाच्या मागण्या

अशावेळी महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत ६ हजाराच्या आसपास आहे. एका रुग्णाला २० – २० इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत.

अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी अशी आग्रही मागणी टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केलीय. त्याचबरोबर म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराबाबत जनजागृतीची गरज असल्याचं टोपे म्हणाले. काळ्या बुरशीवर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याटं टोपे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’मुळे ५६ वर्षीय हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू, पोलीस दलातील तिसरा बळी

News Desk

“लस घेऊनही स्वतःला वाचवू शकले नाहीत,हे कसले डॉक्टर”, रामदेव यांचे अजून एक वादग्रस्त विधान

News Desk

पुण्यात नवी नियमावली जारी ! संध्याकाळी ५ वाजल्यानंतर लागू होणार संचारबंदी

News Desk