HW News Marathi
महाराष्ट्र

राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो नवा व्हायरस, राजेश टोपे स्वत: पुण्याला जाणार!

जालना | काँग्रेसचे राज्यसभेचा खासदार राजीव सातव यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे उद्या (१६ मे) पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये जाऊन सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत आरोग्य मंत्र्यांनी नवी माहिती दिली आहे. दरम्यान, आज (१५ मे) काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही सातव यांची भेट घेतली होती.

राजीव सातव यांची परिस्थिती नाजूक असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला असून, हा व्हायरसही नवीन प्रकारचा व्हायरस आहे. याबाबतीत राजीव सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरशी आपण संपर्कात असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

“राजीव सातव यांची प्रकृती थोडी नाजूक आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. राजीव सातव बरे होत असताना त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो हा नवा व्हायरस सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असून इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक आहे. पण डॉक्टर पूर्णत: प्रयत्न करत आहेत, काळजी घेत आहेत.

“सर्वकाही उपचार केले जात आहेत. तज्ज्ञातले तज्ज्ञ डॉक्टर बोलावून आपल्या मराठवाड्यातील या सुपुत्रावर उपचार केले जात आहेत. मुंबई-पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. मी स्वत: उद्या त्यांना भेटण्यासाठी जात आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत”.

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबईतील नुकसानग्रस्तांना देखील मदत करा’, अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांना मागणी

News Desk

लोकायुक्तांकडून आज अनिल परब यांची सुनावणी!

News Desk

‘राजू शेट्टी बिनबुडाचा लोटा’ शेट्टी, म्हणतात, कुणाची भाटगिरी करताय?

News Desk