HW News Marathi
Covid-19

राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

जालना | राज्यातील कोरोना रुग्ण संख्येची वाढ पाहता पुन्हा एकदा आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन होणार का यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. सगळ्यांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन केला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज (११ एप्रिल) जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली असून लॉकडाऊनमध्ये टास्क फोर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे टास्क फोर्स सोबत होणाऱ्या बैठकीत त्यांनी केलेल्या सूचना आवर्जून पाळून त्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असेही टोपे यांनी सांगितले.

आज किंवा उद्या लगेचच लॉकडाऊन लागणार नसून संपूर्ण नियोजन झाल्यानंतरच लॉकडाऊनची घोषणा केली जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यात ऑक्सीजनचे उत्पादन बाराशे मेट्रिक टन होत असून हा सर्व साठा मेडिकलसाठी वापरला जात आहे. एखाद्या उद्योजकाने ऑक्सिजन साठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही टोपे म्हणाले.

तसेच, ज्या कोरोना बाधित रुग्णाला रेमडेसीवीरची गरज आहे, त्यालाच यापुढे इंजेक्शन दिले जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले आहे. तसचं, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगळा स्टाफ आणि लसीकरणासाठी वेगळा स्टाफ नेमण्यात आला असून आरोग्य विभागात रिक्त जागा भरणे सुरू आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता यापुढे राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनची कमतरता येणार नसून कंपनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या इंजेक्शनचा पुरवठा करणार असून गरज असलेल्या रुग्णांना जिल्हाधिकारी हे इंजेक्शन पुरवतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काल ७८२७ नवे रुग्ण आढळले, तर ३३४० जण झाले कोरोनामुक्त

News Desk

परळी वैजनाथ येथील महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे आदेश…

News Desk

मराठा समाजासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा ! चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk