HW News Marathi
महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीस दिल्लीचे ब्ल्यू बॉय आय!”

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावेळी विधीमंडळात केवळ २ दिवसांचेच पावसाळी अधिवेशन आयोजित केले. आज (८ सप्टेंबर) या अधिवेशनाचा शेवटचा दिवस. यावेळी विरोधीपक्ष नेते आणि सत्ताधारी पक्षांकडील नेत्यांमध्ये अनेक विषयांवरुन वाद विवाद झाले. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना, “देवेंद्र फडणवीस हे दिल्लीचे ब्लू आय बॉय आहेत, असे संबोधले. त्यांनी केंद्राला सांगून महाराष्ट्राला कोरोनाच्या उपचारासाठी पुरवण्यात येणाऱ्या साहित्यसामुग्रीचा पुरवठा सुरु ठेवावा, असे वक्तव्य केले.

“केंद्र सरकारकडून राज्यांना कोरोनाच्या उपचारांसाठी करण्यात येणारा साहित्यसामुग्रीचा पुरवठा १ सप्टेंबरपासून बंद झाला आहे. त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. परंतु, दिल्लीचे ब्लू आय बॉय असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यासे हे पैसे वाचू शकतात. त्यांनी केंद्राला यासंदर्भात सांगावे. जेणेकरून राज्याचे ३०० कोटी रुपये वाचतील“, असा दावा राजेश टोपे यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच ! । निलेश राणे

News Desk

“वानखेडे कुटुंबियांबाबत वक्तव्य करणार नाही!”, मलिकांची न्यायालयात हमी

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, चौकशीला गैरहजेरी

News Desk